शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 22:02 IST

"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे."

आपले सरकार, जनतेचा विचार, विकास आणि श्वास या त्रिसूत्रीवर काम करत आहे. आज लोकांना माहीत आहे की, हे सरकार काम करणारे सरकार आहे. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारे सरकार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजीही उशिरापर्यंत काम करतात. अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात. त्यामुळे २४/७ हे सर्कल सुरू आहे. आता तुम्ही मला कधीही दोन-तीन-चार वाजताही काम करताना पाहू शकता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते बोलत असतानाच, हसत अजित दादा म्हणाले, "सीएम साहेब चालू आहे, म्हणजे काम करायला चालू आहे." यावर सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

... तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे -कायकर्त्यांसोबत संवाद साधताना शिंदे म्हणाले, "राज्याचे वर्तमान सुधारले आहे. आता भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. आपण सर्व जण येथे उपस्थित आहात. आपण आपल्या सरकारची ताकद आहात. म्हणून महायुतीची एकजूट मजबुतीने पुढे न्यायला हवी. आता एकजूट महत्वाची आहे. ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा." तसेच, "हे सरकार काम करणारे आहे, हे लोकांनीही मान्य केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ही आपल्यासाठी मोठी, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे," असेही शिंदे म्हणाले.

आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला -"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे. गेली दोन वर्षे आपण पाहिले तर, आमच्या कॅबिनेटमध्ये एकहि निर्णय वैयक्तिक लाभाचा घेतलेला नाही. सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीस होतो, आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला. आम्हाला वैयक्तीक काहीच नाही.  केवळ या राज्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. माझ्या राज्यातील शेतकरी, माता भगिणी यांना चांगले दिवस यायला हवेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडायला हवा," असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस