ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे

By Admin | Updated: September 23, 2016 14:38 IST2016-09-23T13:46:25+5:302016-09-23T14:38:16+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.

Aishwarya, Shahrukh's movie will not be displayed - MNS | ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे

ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - पाकिस्तानी कलाकारांनी येत्या ४८ तासात भारत सोडून जावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू असा इशारा देणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. 
 
'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या दोन्ही चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग आहे. रणबीर कपूर-ऐश्वर्या रायची मुख्य भूमिका असलेल्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. त्यानंतर शाहरुखच्या 'रईस'मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आहे. तिने शाहरुखच्या पत्नीची भूमिका केली आहे. 
 
पाकिस्तानी कलाकार,खेळाडू, गायक भारतात येऊन पैसे कमावतात आणि पाकिस्तान आपल्यावरच हल्ले करून आपल्या जवानांचे बळी घेतो त्यामुळे मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 
 
यापूर्वीही अनेकदा शिवसेना आणि मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात भूमिका घेतली आहे. जो पर्यत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तो पर्यंत त्यांच्या कलाकारांना भारतात प्रवेश देऊ नये अशी मनसेची भूमिका आहे. 

Web Title: Aishwarya, Shahrukh's movie will not be displayed - MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.