शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिपीतून विमान 'उडविल्या'शिवाय स्वस्थ बसणार नाही : सुरेश प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 13:13 IST

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

सावंतवाडी : चिपी विमानतळाच्या टर्मिनलचे उद्धाटन आज करण्यात येत असून विमान सेवा सुरू केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार नागरी विमानोड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. 

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक विरेंद्र म्हैसकर यांना सुंदर विमानतळ उभारण्याचे श्रेय दिले. तसेच उद्योगासाठी आम्ही प्रयत्नशील असून भुमिपूत्रांना रोजगार मिळवून देणार, असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. सी वर्ल्ड प्रकल्पाचा विषय पुढील सहा महिन्यात मार्गी लावणार असल्याची घोषणा केली. कोकणात रेल्वेचे 22 हजार कोटीचे प्रकल्प सुरु असून जिल्ह्यात पोलिस चांगले काम करत असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन केले. 

तत्पूर्वी, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे उद्योग धोरण आज मुंबईत जाहीर होणार असल्याचे सांगितले.  विमानतळामुळे विकासाला चालना मिळे. आडारीमध्ये प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न सुरु असून गोव्यातील उद्योजक आडारी येथे येणार आहेत. त्यामुळे रोजगार वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

सुरेश प्रभू यांनी पुढील दोन- तीन वर्षांत उड्डाण योजनेचा फायदा देशाला होईल. 2022 पर्यंत नव्या भारताची संकल्पना उदयास येणार असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरीतील विमानतळ लवकरच कार्यन्वित करणार असल्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले. या कार्यक्रमावेळी गुजरातमध्ये सुरू असलेल्या पेन्शन योजनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. पंतप्रधान जाहीर करत असलेल्या पेन्शन योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रात होणार असून तब्बल अडीच लाख पेन्शनर्स असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

राणेंच्या स्वप्नपूर्तीसाठी केसरकरांना पाठिंबादीपक केसरकर यांनी नारायण राणेंचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची घोषणा केली. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी  राणेंचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री केसरकर यांनी घेतलीय; त्याला माझा पाठींबा जाहीर करत आहे, सिंधुदूर्गच्या विकासाचा गाडा कोणीही थांबवू शकणार नाही, असे सांगितले. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूChipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSubhash Desaiसुभाष देसाई