विमान अपघात : लाओसचे उपपंतप्रधान मृत्युमुखी
By Admin | Updated: May 17, 2014 22:57 IST2014-05-17T22:57:13+5:302014-05-17T22:57:13+5:30
लाओसच्या एका लष्करी विमानाला शनिवारी झालेल्या अपघातात संरक्षणमंत्री तथा उपपंतप्रधान डाऊंगचे पिचित यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी मारले गेले.

विमान अपघात : लाओसचे उपपंतप्रधान मृत्युमुखी
>बँकॉक : लाओसच्या एका लष्करी विमानाला शनिवारी झालेल्या अपघातात संरक्षणमंत्री तथा उपपंतप्रधान डाऊंगचे पिचित यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी मारले गेले. थायलंड सरकार आणि लाओसच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
लाओसची राजधानी व्हिएनटीनेपासून सुमारे 5क्क् किलोमीटर दूर उत्तरेकडे शिआनखोवांग प्रांतातील एका शासकीय समारंभात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण विमानातून जात होते. देशातील प्रमुख प्राचीन स्थळ प्लेन ऑफ जार्सनजीकच्या जंगलात हे विमान कोसळले. युक्रेनच्या अँटोनोव्ह कंपनीने तयार केलेल्या या विमानात व्हिएनटीनेचे गव्हर्नर आणि अन्य प्रमुख व्यक्ती यांच्यासह 2क् जण असल्याचे समजते.
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, लाओसचे संरक्षणमंत्री तथा उपपंतप्रधान डाऊंगचे पिचित यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी विमान अपघातात मारले गेले. लाओसच्या एका वरिष्ठ अधिका:याने थायलंड सरकारला याबाबत कळविले. लाओसच्या सरकारी वृत्तसंस्थेने या विमान अपघातास दुजोरा दिला असून अधिकारी मदत आणि बचाव मोहीम राबवत असल्याचे सांगितले. लाओसच्या हवाई दलाद्वारा संचालित अँटोनोव्ह एएन 74 टीके 3क्क् हे विमान अपघातग्रस्त झाले. (वृत्तसंस्था)