ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती

By Admin | Updated: July 20, 2014 02:59 IST2014-07-20T02:59:25+5:302014-07-20T02:59:25+5:30

बॉम्बे हाय येथील ओएनजीसी कंपनीच्या विहिरीतून वायुगळती झाल्याची घटना शनिवारी घडली. खोदकामादरम्यान वायुगळती झाल्यानंतर त्वरित बचावकार्य हाती घेण्यात आले.

Airgate from ONGC wells | ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती

ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती

मुंबई : बॉम्बे हाय येथील ओएनजीसी कंपनीच्या विहिरीतून वायुगळती झाल्याची घटना शनिवारी घडली. खोदकामादरम्यान वायुगळती झाल्यानंतर त्वरित बचावकार्य हाती घेण्यात आले. त्यामुळे सर्व कर्मचारी सुखरूप असल्याचा दावा कंपनीने केला.
मुंबईच्या समुद्रकिना:यापासून आत कंपनीच्या वतीने खोदकाम सुरू होते. मात्र अचानक वायूची गळती झाली. तत्काळ बचावकार्य हाती घेत घटनास्थळावरील 
82 जणांपैकी 4क् जणांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शिवाय खबरदारीची उपाययोजना म्हणून नौदल आणि तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली. तसेच बचावकार्यासाठी पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरचीदेखील मदत घेण्यात आली.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, वायुगळती अनपेक्षितरीत्या झाली. मात्र गळतीदरम्यान बाहेर पडलेला वायू फार दूरवर पसरलेला नाही. बचावकार्य हाती घेण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. शिवाय घटनास्थळावरील कामदेखील थांबविण्यात आले असून, या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. (प्रतिनिधी)

 

Web Title: Airgate from ONGC wells