मुंबई विमानतळावर विमानाला आग

By Admin | Updated: January 22, 2017 00:19 IST2017-01-22T00:19:03+5:302017-01-22T00:19:03+5:30

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईनच्या विमानाला उड्डाणावेळी आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Aircraft fire at Mumbai airport | मुंबई विमानतळावर विमानाला आग

मुंबई विमानतळावर विमानाला आग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईनच्या विमानाला उड्डाणावेळी आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,  इंडिगो एअरलाईनच्या 6 ई- 248 विमानाच्या एका इंजिनमध्ये उड्डाणावेळी बिघाड होऊन आग लागली. ही आग टर्बाइनचं ब्लेड तुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असून हे मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार होते.
दरम्यान, विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: Aircraft fire at Mumbai airport