शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 07:16 IST

माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती.

- कमल शर्मानागपूर : वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष व गुजरातमध्ये वडोदरासाठी एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक बाब ठरल्याचे सांगितले जात आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती. ‘लोकमत’कडे भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत आहे. यात त्यांनी प्रकल्पासाठी नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते.  

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच याबाबत दिल्लीत चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्प मिहानमध्ये येत असल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते.       

मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. एअरबस प्रकल्प नागपुरात आला असता तर त्याला प्रोत्साहन मिळाले असते. विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसायही विकसित झाला असता.      - प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष, वेद

टॅग्स :TataटाटाNitin Gadkariनितीन गडकरीChagan Bhujbalछगन भुजबळ