शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अंतराळात मानव पाठविण्यासाठी हवाई दल, इस्त्रोची संयुक्त मोहीम : लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 17:00 IST

भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळ वीर अवकाशात पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्देएएफएमसीमध्ये ६७ वे वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्र देशातील नामांकित रुग्णालये आणि वैद्यकीय संस्था तसेच मित्र राष्ट्रांशी याबाबत सामंजस्य करार अंतराळात मानव पाठविण्याचा माननिय पंतप्रधान यांचा महत्वाकांशी प्रकल्प

पुणे :  अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत.  या प्रकल्पाअंतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारे आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बेंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसीन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्त्रो आणि हवाई दलाच्या मेडीकल विभागाच्या अधिका-यांच्या काही बैठका झाल्या असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली,’’ अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७ व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात  भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते. या प्रसंगी लष्करी वैद्यकीय सेवेचे लष्करी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोमोय गांगुली, नौदलाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल अनुप बॅनर्जी, हवाई  दलाचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख एअर मार्शल राजवीर सिंग, लेफ्टनंट जनरल व्ही.के.शर्मा, लेफ्टनंट जनरल आर.एस. ग्रेवाल, लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सिंग, एअर मार्शल आर.के.राणा उपस्थित होते. पुरी म्हणाले, अंतराळात क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत.    अंतराळात मानव पाठविण्याचा माननिय पंतप्रधान यांचा महत्वाकांशी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून  (इस्रो) लवकरच मानवी मोहीम आखली जाणार आहे. भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळ वीर अवकाशात पाठविला जाणार आहे. यामुळे अंतराळात मानवाला कुठल्या समस्यांना समोरे जावे लागू शकते, अंतराळात गेल्यावर मानवाला येणा-या आरोग्याच्या समस्या या बाबतचे संशोधन आणि उपाय योजनांचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे. या साठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसिन या संस्थेच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांसोबत काही बैठक घेण्यात आल्या आहेत. या बाबत संयुक्त आराखडा तयार करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. या संस्थेतर्फे आंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यात अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणाली यावर भर देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसीन या संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इस्रो कडून संस्थेची निवड करण्यात आली आहे, असेही पुरी म्हणाले. ......................मित्र राष्ट्रांसोबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्रवैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक संशोधनासाठी देशातील नामांकीत रुग्णालये आणि वैद्यकीय संस्था तसेच मित्र राष्ट्रांशी याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबत संशोधन करण्यात येत आहे. आशियातील मित्र राष्ट्रांसोबत ८ ते १६ मार्च मध्ये आपत्कालीन परिस्थितीत एकत्रित काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आत्ता पर्यंत १८ देशांनी सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तर निरीक्षक म्हणून अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.................मराईन मेडिसीन एम.डी. पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात  भारतीय नौदल जागतिक स्तरावरील सर्वात मोठे नौदल असून आंतराष्ट्रीय समुद्रात भारतीय लढाऊ नौका आणि पाणबुड्या यांचा मुक्त वावर आहे. यामुळे  जहाजावरील सैनिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी कुशल वैद्यकीय तज्ञ तयार करण्यासाठी मुंबई येथील आयएनएस अश्विनी या नौदल रुग्णालयात तीन वर्षे कालावधीचा मराईन मेडिसिन एम.डी. पदवी सुरू करण्यात येणार आहे. नौदलाच्या जहाजावर चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी टेलीमेडिसिन सुविधा सक्षम करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे लेफ्ट जनरल बिपीन पुरी यांनी सांगितले.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदकडून मेडिकल रिसर्च युनिट सुरू करण्यात आले असून वैद्यकीय संशोधन करिता त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल. अवकाश, उंच पर्वत ठिकाण, जंगल याठिकाणी सैनिकांना कोणत्या प्रकारचे वैद्यकीय समस्या जाणवत आहे याबाबत उपाययोजना करण्यासाठी संशोधन केले जात आहे. डीआरडीओ, अमेरिकन इन्स्टिट्यूट यांच्या मदतीने अत्याधुनिक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Puneपुणेindian navyभारतीय नौदलIndian Armyभारतीय जवानisroइस्रो