शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:53 IST

Imtiaz Jaleel News: सरकारकडून पूरग्रस्त लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन बंद करावे, अशी टीका करण्यात आली आहे.

Imtiaz Jaleel News: पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत पाऊस सरासरीपेक्षा ६० टक्के जास्त झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक ठिकाणी पाऊस आणि पूरस्थिती कायम आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल, असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाला लगावण्यात आला आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती आहे. सोलापुरातील पूरग्रस्त तिऱ्हे गावाला भेट दिली. एमआयएम पक्षाकडून पूरग्रस्त भागांना मदत केली जात आहे. सरकारकडून पूरग्रस्त लोकांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन आहे ते बंद करावेत, अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केली. 

गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल

सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी, आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल ते बघावे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात.  ही सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, या शब्दांत निशाणा साधताना, गुवाहाटी येथून आणलेले पैसे जर दिले, तर महाराष्ट्रातील लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपवू शकता, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.

दरम्यान, रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaleel Slams Shinde Group: Guwahati Funds Could End People's Suffering.

Web Summary : Imtiaz Jaleel criticized the Shinde group, suggesting funds from Guwahati could alleviate flood-related suffering in Maharashtra. He urged ministers to stop photo ops and provide real assistance to flood-affected farmers, proposing Google Maps monitoring and meetings for effective aid delivery.
टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलShiv SenaशिवसेनाRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी