कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
By प्रमोद सुकरे | Updated: June 13, 2025 23:43 IST2025-06-13T23:43:23+5:302025-06-13T23:43:42+5:30
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र या प्रवासात दरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांना घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते.

कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
- प्रमोद सुकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : गुजरात अहमदाबाद मध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. त्यात तब्बल २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रवासात कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी हिचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या विमान अपघातात कराडची कन्या गमावल्यामुळे कराडकरांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील सोमवार पेठ भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्य करतात. त्यांची इंजिनिअर असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील उद्योजक गौरवकुमार ब्रह्मभट याचे बरोबर झाला होता. ते दोघेही अहमदाबाद मध्ये राहत होते.अहमदाबाद ते लंडन प्रवासासाठी याच विमानात ते बसले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला .
दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही बातमी कराड शहरात पसरली. त्यामुळे कराडची एक कन्या गमावलीची हळहळ कराडकरांच्यातून व्यक्त होत आहे.
मुले सासू-सासऱ्यांकडे
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र या प्रवासात दरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांना घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.