अहलुवालियांचा नियोजन आयोगाचा राजीनामा
By Admin | Updated: May 17, 2014 22:40 IST2014-05-17T22:40:13+5:302014-05-17T22:40:13+5:30
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंह अहलुवालिया यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला़ आयोगाचे इतर सदस्यसुद्धा राजीनामा देण्याच्या प्रक्रियेत आहेत़

अहलुवालियांचा नियोजन आयोगाचा राजीनामा
>नवी दिल्ली : केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंह अहलुवालिया यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला़ आयोगाचे इतर सदस्यसुद्धा राजीनामा देण्याच्या प्रक्रियेत आहेत़
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अहलुवालियांनी आपला राजीनामा मावळते पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे सपूर्द केला़ आयोगाचे सदस्य बी़क़े चतुव्रेदी यांनीही आपला राजीनामा दिला आह़े
चतुव्रेदी म्हणाले की, आयोगाच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आह़े इतर सदस्यांबाबत माहिती नाही; परंतु मी सदस्यपदाचा राजीनामा दिला आह़े अहलुवालियांशिवाय आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यांत बी़ के.चतुव्रेदी, सौमित्र चौधरी, सईदा हामिद, नरेंद्र जाधव, अभिजित सेन, मिहिर शाह, के. कस्तुरीरंगन आणि अरुण मायरा यांचा समावेश होता़
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आयोगाचे सदस्य पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची प्रथा आह़े पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात़ सदस्यांचा कार्यकाळ सरकारसमवेत पूर्ण होतो़ निकालानंतर भाजपाचा केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े त्यामुळे नवीन सरकारकडून आयोगाची पुनस्र्थापना होईल़
(लोकमत न्यूज नेटवर्क)