अन् कृषिमंत्री पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:12 PM2020-02-13T15:12:39+5:302020-02-13T15:20:00+5:30

कृषिमंत्री यांनी राज्यात एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरु केला आहे.

Agriculture Minister Dada Bhushe approached the farmers | अन् कृषिमंत्री पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

अन् कृषिमंत्री पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Next

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम कृषी खात्याकडून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत खुद्द कृषीमंत्री महिन्यातून ‘एक दिवस शेतावर’ या उपक्रमात सहभागी होताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सवांद साधला.

शेतकऱ्यांची केवळ पारंपरिक शेतीवरच भिस्त नसावी तर त्यांचा शेतमाल थेट निर्यातीची क्षमता असणारा असावा. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या थेट बांधावरच जावून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे गरजेचे असून, यासाठी कृषिमंत्री यांनी राज्यात एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरु केला आहे.

त्यामुळे गुरुवारी त्यांनी मालेगांव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजुन घेतल्या तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिली. तर थेट कृषिमंत्रीचं आपल्या बांधावर आल्याचे पाहून शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

 

 

 

 

Web Title: Agriculture Minister Dada Bhushe approached the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.