कृषी विद्यापीठाचे संशोधन पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रभावित!
By Admin | Updated: September 8, 2014 01:08 IST2014-09-08T00:46:56+5:302014-09-08T01:08:29+5:30
केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती निवड मंडळाचे माजी अध्यक्ष सी.डी. मायी यांचे मत

कृषी विद्यापीठाचे संशोधन पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रभावित!
अकोला : राज्यातील एकाच कृषी विद्यापिठातील सतराशेपेक्षा जास्त पदं रिक्त असतील, तर विद्यापिठाचा गाडा चालेल तरी कसा? याचाच अर्थ कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या महत्वाच्या विषयांकडे राज्य शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी विद्यापिठाचे संशोधन प्रभावित होत असल्याचा आरोप केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. मायी ५ स प्टेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आले असता, त्यांनी कृषीशी संबंधित अनेक विषयावर ह्यलोकमतह्णशी बातचित केली.
प्रश्न - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील सतराशे जागा रिक्त असण्याचे कारण काय ?
उत्तर - खरे तर याबाबतीत राज्य शासनाने अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पदे रिक्त असणे म्हणजे, कृषी विद्यापिठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर हा मोठा आघात आहे. राज्य शासनाने काही समित्यांवर मला घेतले आहे; पण त्यातून काही साध्य होत नसल्याने या समित्याकडे फारसे लक्ष देणे मी टाळले आहे.
प्रश्न- अपुर्या मनुष्यबळाचे नेमके परिणाम कोणते ?
उत्तर - पुरेशा मनुष्यबळाअभावी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, नवे वाण, तंत्रज्ञान, संशोधन मागे पडले आहे. चांगले शिक्षण हवे असेल तर त्यासाठी चांगले शिक्षक नको का? परंतु विद्यापिठात ही प्रक्रियाच ठप्प पडली आहे.
प्रश्न - नवीन जागा भरण्यासंदर्भात काही उपाययोजना सुरू आहेत का ?
उत्तर - खरे तर उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने अलिकडेच कृषिशास्त्रज्ञ भरती निवड मंडळ स्थापन केले; पण अद्याप हे मंडळ कार्यरत झाले नसल्याने कृषी शास्त्रज्ञांची भरती प्रक्रिया अधांतरी लटकली आहे.
प्रश्न- संशोधनावर कोणते परिणाम होत आहेत ?
उत्तर - पुरेसे मनुष्यबळ नसल्याने संशोधनावर दूरगामी परिणाम होत आहेत. विदर्भासारख्या मागासलेल्या भागातील उत्पादनाचे प्रमाण बघितल्यास सर्वच पिकांच्या बाबतीत आपण पिछाडीवर आहोत, हे स्पष्ट होते. अशा प्रकारे संशोधनाचा परिणाम थेट शेतकर्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. नवे वाण, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यावर र्मयादा आल्या आहेत. अल्प मनुष्यबळात विस्तार कामही शास्त्रज्ञांनाचा करावे लागत असल्याने सर्व कामेच ठप्प पडल्यासारखी झाली आहेत. विशेष म्हणजे या राज्यात १४0 पेक्षा जास्त कृषी महाविद्यालयांच्या परीक्षा व इतर अनेक प्रकारची जबाबदारी कृषी विद्यापिठाच्या प्राध्यापकांवर आहे. यातूनच या प्राध्यापक, शास्त्रज्ञांना उसंत मिळत नाही.
प्रश्न - विदर्भातील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी काय करावे लागेल ?
उत्तर - कृषी विद्यापिठांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे वाण, तंत्रज्ञान विकसित करावे लागणार असून, उत्पादन, प्रक्रिया व मालाची विक्री अशी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे.
चांगले उत्पादन देणार्या पिकासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे; अर्थात पीक बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी फलोत्पादन विकासातून डाळिंब व इतर फळे उत्पादक गट उभारणे आवश्यक आहे; पण पुरेसे मनुष्यबळच नसल्याने, हे सर्व करणार तरी कोण, हा खरा प्रश्न आहे. डॉ.पंदेकृविचा विकास व इतर कामे करण्यासाठी तातडीची १00 कोटींची गरज आहे.
प्रश्न - आपण याबाबतीत काही पाऊलं उचलली का ?
उत्तर - मी अध्यक्ष असताना अनेक कामे मार्गी लावली. आता मी माझ्या परीने प्रयत्नशील आहे. शेवटी जे करायचे आहे, ते राज्य शासनालाच करावे लागेल.