राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
By Admin | Updated: August 19, 2016 18:54 IST2016-08-19T18:54:38+5:302016-08-19T18:54:38+5:30
राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
_ns.jpg)
राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
साडे चौदा हजार जागांसाठी ६९ हजार अर्ज ; प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ : राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. कृषी अभ्यासक्रसाठी स्पर्धा वाढल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. २३ केंद्रावर सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय २,७७४ जागा आहेत तर खासगी कृषी महाविद्यालयातंर्गत १२ हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय ७५५ तर खासगी महाविद्यालयाच्या २,३४० एवढी प्रवेश क्षमता असून,अहमदनगर जिल्हयातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ८४४,खासगी ४,५७० परभणीच्या स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत ७९२, खासगी महाविद्यालया आणि कोकणात दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३५६ तर खासगी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १,५५० एवढी आहे.
कृषी पदवीसाठी कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शास्त्र, वनविद्या शास्त्र,कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासह अनेक विषय आहेत.यामध्ये कृषी या विषयासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाचे ९२ महाविद्यालय असून, १९ शासकीय तर ७३ महाविद्यालये खासगी आहेत.शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार १२ तर खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही ७,२९० एवढी आहे. म्हणजेच एकूण १४,७४७ जागांमध्ये ९,३०२ जागा कृषीच्या आहेत.
प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व स्पॉट अॅडमिशनसाठी यावर्षी खासगी शासकीय महाविद्यालयांना जोडण्यात आली आहेत.येत्या तीन दिवसात प्रवेश प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. याकरिताच खासगी महाविद्यालयाचे प्रवेश कृषी विद्यापीठांच्या शासकीय महाविद्यालयातून केले जात आहेत.