राज्य शासनाचा मलेशियन कंपनीसोबत करार
By Admin | Updated: July 31, 2016 03:40 IST2016-07-31T03:40:56+5:302016-07-31T03:40:56+5:30
रस्ते विकासामध्ये मलेशियातील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड (सीडबी) ही कंपनी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

राज्य शासनाचा मलेशियन कंपनीसोबत करार
मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते विकासामध्ये मलेशियातील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड (सीडबी) ही कंपनी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सीडबी होल्डिंग यांच्यात शनिवारी यासंबंधीचा सामंजस्य करार झाला.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात सीडबीचे चेअरमन जुडिन बीन अब्दुल करीम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, यांच्यासह सिडबीचे दातो सु ली, ज्युलीया बीन, अब्दुल करीम, अब्दुल लतिम थिन आदी उपस्थित होते. ‘सीडबी होल्डिंग’ ही कंपनी मलेशियन सरकारचा उपक्र म असून ही कंपनी महाराष्ट्रातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांचा विकास करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)