शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 02:33 AM2020-09-29T02:33:52+5:302020-09-29T02:34:15+5:30

यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली

The agitation of non-teaching staff of the university continues even after the meeting with the Minister of Education | शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

Next

मुंबई : महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याप्रश्नी आॅनलाइन बैठक घेतली. मात्र, चर्चा झालेल्या मागण्या मान्य झाल्याचे लेखी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शिक्षकेतर कर्मचाºयांनी घेतला.

महाराष्ट्रातील १३ अकृषी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी, विद्यापीठ, महाविद्यालयातील रिक्त पदे भरावीत, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मुंबई विद्यापीठातही सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले असून, १,२०० शिक्षकेतर कर्मचाºयांनी यात सहभागी झाले. कलिना विद्यापीठात अनेक परीक्षार्थी विद्यार्थी कामासाठी आले असता, त्यांचे कोणतेही काम होऊ शकले नाही. आंदोलनामुळे विद्यापीठांमधील काम ठप्प झाल्याने याचा मोठा फटका परीक्षा विभागातील तयारीला बसला आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली. विद्यार्थी हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या जात नाहीत, राज्यातील सर्व संघटना यावर एक निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी कार्यकारी समन्वय समितीचे निमंत्रक दीपक घोणे यांनी दिली.

सरकार मागण्यांवर सकारात्मक
राज्यातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. या कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, यानंतर त्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग

Web Title: The agitation of non-teaching staff of the university continues even after the meeting with the Minister of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.