शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

"एज इज जस्ट अ नंबर"; प्रफुल्ल पटेलांनी पोस्ट लिहिली अन् सुप्रिया सुळेंनी संधी साधत षटकार मारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वय हा तर फक्त एक आकडा आहे, असं म्हणत महिला खेळाडूचं अभिनंदन केलं.

Supriya Sule Vs Praful Patel ( Marathi News ) : सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा विरोध डावलून अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर स्वत: अजित पवार यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून शरद पवार हे आता वयोवृद्ध झाले असून त्यांनी विश्रांती घेऊन नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं सांगितलं जात होतं. मात्र आज एका महिला खेळाडूचं अभिनंदन करताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वय हा तर फक्त एक आकडा आहे, असं म्हटलं. हीच संधी साधत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "जेव्हा एखाद्या गोष्टीची आवड आणि दृढनिश्चय असेल तर वय हा केवळ आकडा ठरतो. हरियाणातील कादमा गावातील रहिवासी असलेल्या १०७ वर्षीय रामबाई यांनी सिद्ध केलं की स्वप्नांना कोणतीही एक्स्पायरी डेट नसते. राष्ट्रीय मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रामबाई यांनी मिळवलेली दोन सुवर्णपदके ही त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहेत. रामबाई यांच्या उदाहरणातून आपणही प्रेरणा घेऊयात आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही, हे स्वत:ला सांगुयात," असं पटेल यांनी लिहिलं होतं. पटेल यांच्या याच पोस्टला रिप्लाय देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. वय हा तर केवळ एक आकडा आहे."

दरम्यान, वय हा केवळ आकडा असेल तर तुम्ही शरद पवार यांना राजकीय निवृत्ती घेण्याचे सल्ले का देत होतात, अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांकडूनही प्रफुल्ल पटेल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एका महिला खेळाडूचं अभिनंदन करताना प्रफुल्ल पटेल यांनी वापरलेले शब्द त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरलेले दिसत आहेत.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार