अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:27 IST2025-02-12T05:27:20+5:302025-02-12T05:27:44+5:30

आपत्ती व्यवस्थापनाच्या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नाही. 

after the outrage, Eknath Shinde role in disaster management was changed; rules were changed | अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल

अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल

मुंबई - राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

नाराजीनाट्यानंतर प्राधिकरण नियमात बदल
नव्या रचनेत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व नऊ सदस्य असतील. त्यात मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. पदसिद्ध सदस्य पदासाठी मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. २०१९ च्या रचनेनुसार मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असत. तर महसूल, वित्त, गृह, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य या विभागांचे मंत्री हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नाही. 

राजकीय गदारोळ 
प्राधिकरणाची पुनर्रचना करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. यावरून राजकीय गदारोळ निर्माण झाला. यामुळे शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही माध्यमांमधून झळकल्या होत्या. त्यानंतर हा बदल झाला आहे.

Web Title: after the outrage, Eknath Shinde role in disaster management was changed; rules were changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.