शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 08:00 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पक्षावर टीका केली आहे.

Haryana Assembly Election Result : हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी समोर आले. हरयाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. हरयाणात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने सत्ता मिळवली आहे. हरयाणामध्ये भाजपविरोधी लाट असल्याचा प्रचार काँग्रेस विरोधी पक्षांकडून केला जात होता. मात्र निकालात त्या विरुद्ध चित्र दिसले.  भाजप हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. यावरुनच ठाकरे गटाने काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हरयाणात स्थिती अनुकूल असतानाही काँग्रेसला फायदा घेता आला नाही, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काँग्रेसची अंतर्गत सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर 

"हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरयाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे. हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते. पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. भाजपच्या मंत्र्यांना व उमेदवारांना हरयाणातील गावात घुसू देत नाहीत असा माहोल होता. तरीही हरयाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले. पंतप्रधान मोदी यांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले व हरयाणात स्थिती अनुकूल असतानाही काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसच्या बाबतीत हे नेहमीच घडते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर येणार नाही असे पक्के वातावरण मागच्यावेळी होते, पण काँग्रेस पक्षाची अंतर्गत सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर पडली," असे सामना अग्रलेखात म्हटलं आहे. 

काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल

"हरयाणात मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेस पक्षाची नौका डुबवली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसचे सूत्रधार आपणच व आपण ठरवू तेच उमेदवार अशी हुड्डा यांची भूमिका होती. पक्षातील कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा जाहीर अपमान हुड्डा तसेच त्यांच्या लोकांनी केला व काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड हुड्डा यांना रोखण्यात अपयशी ठरले. हरयाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन केले. हरयाणातील महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगावर भाजपने व त्यांच्या पंतप्रधानांनी कोणतीच कारवाई केली नाही. विनेश फोगाट व तिच्या सहकाऱ्यांना दिल्लीतील जंतरमंतर रोडवरून फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले… या सगळ्याची चीड हरयाणातील जनतेत स्पष्ट दिसत होती. अर्थात विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी तिच्यावरील अन्यायामुळे हरयाणात सर्वदूर निर्माण झालेल्या संतापाचा, नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला नाही. हरयाणात भाजपविरोधी लाट होती व त्या लाटेत भाजप वाहून जाईल असे सांगितले जात होते, पण तसे घडले नाही. कारण काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व ‘स्ट्रटेजी’ बिनचूक ठरली. मध्य प्रदेशात कमलनाथांनी भाजपला सरळ मदत केली. हरयाणात हुड्डा यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा होता, तरीही हुड्डा हे काँग्रेसबरोबरच राहिले. हरयाणातील जाट समुदायाचे ते मोठे नेते, पण इतर समाजाला ते काँग्रेसबरोबर उभे करू शकले नाहीत. जाट विरुद्ध इतर समाज असा हा सामना झाला व त्यात भाजपने बाजी मारली," असे ठाकरे गटाने म्हटलं आहे.

भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद

"पुन्हा हरयाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही ‘वाटा’ आहेच. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी ‘पॅरोल’वर कसा सुटतो? याआधीच्या निवडणुकांतही बाबा राम रहीमचे हे‘निवडणूक कनेक्शन’ दिसून आले हेते. निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, “भाजपच जिंकेल. आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे.’’ सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली; पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली व काँग्रेस पिछाडीवर गेली. निवडणूक आयोगानेही नंतर मतमोजणीची गती मंद केली. हे का घडले? काँग्रेसची सर्वत्र आघाडी दिसत असताना मतमोजणी आणि त्याविषयीचे ‘अपडेटस्’ यांची गती अचानक कमी का झाली? काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यावरून निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत. हरयाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद ठरला आहे," असा दावा ठाकरे गटाने केला आहे. 

महाराष्ट्रातील जनता हरयाणाच्या मार्गाने जाणार नाही 

"तेव्हा मोदी व शहा यांनी हरयाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये. कारण महत्त्वाचे राज्य असलेल्या जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. हरयाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरयाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल. मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरयाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे. हरयाणात काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले. कारण सत्तेत त्यांना वाटेकरी नको होते. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाला. हरयाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार?," असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Haryanaहरयाणाcongressकाँग्रेस