सुळे यांच्या विजयानंतरही शुकशुकाट
By Admin | Updated: May 17, 2014 21:42 IST2014-05-17T19:52:19+5:302014-05-17T21:42:57+5:30
दौंड तालुकयामध्ये सुप्रिया सुळे ७३ हजार मतांनी विजयी होवुनही दोन्ही गटामध्ये शुकशुकाट होता.

सुळे यांच्या विजयानंतरही शुकशुकाट
सुळे यांच्या विजयानंतरही शुकशुकाट
केडगाव। दि.२३(वार्ताहर)
दौंड तालुकयामध्ये सुप्रिया सुळे ७३ हजार मतांनी विजयी होवुनही दोन्ही गटामध्ये शुकशुकाट होता.याचे कारण म्हणजे राष्टवादीचा बालेकिला असणारा हा मतदार संघ जानकर यांना २५ हजाराने मताधिकय दिल्याने कार्यकर्त्यामध्ये सुळे विजयी होवुनही उत्साह नव्हता.जानकर पराभुत झाल्याने भाजपा ,शिवसेना व राष्टीय समाज पक्षाच्या कार्यकर्ते उदासीन होते.त्यामुळे तालुकयाचे आमदार रमेश थोरात यांचे गाव खुटबाव ,भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचे गाव राहु व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांचे पारगाव व तालुकयातील सर्वात मोठी बाजारपेठ केडगाव येथे कार्यकर्त्यानी कसलाही आनंद व्यकत केला नाही.या उलट कार्यकर्त्यानी दुरदर्शन समोर बसुन देशातील व महाराष्टातील निवडणुकीची माहिती घेणे पसंत केले. तालुकयातील सर्वात मोठी बाजारपेठ ग्राहक न फिरकल्याने निर्मनुष्य होती.