शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

Aaditya Thackeray on Sridhar Patankar ED Raids: "सध्या जे काही घडतंय..."; CM Uddhav यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत आदित्य ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:58 IST

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे ठाण्यातील ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केल्याची माहिती

Aaditya Thackeray on Sridhar Patankar ED Raids: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. PMLA कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी यांच्या यावर प्रतिक्रिया आल्या. श्रीधर पाटणकर हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंचे मामा आहेत. त्यामुळे आपल्या मामांवर ईडीने केलेल्या कारवाईबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

"मला तुमच्याकडून येणाऱ्या प्रश्नांची माहिती आहे. सध्या जे काही घडलंय याबद्दल माझ्यापर्यंत फार त्रोटक माहिती आलेली आहे. आम्ही सारेच आतापर्यंत विधिमंडळात होतो, हाऊसमध्ये नेटवर्क नसतं हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहिती आहे. त्यामुळे मला या प्रकरणाबद्दल आता तरी नीटशी कल्पना नाही. मला या साऱ्या प्रकरणावर नीट माहिती घेऊ दे आणि मी मग तुमच्याशी बोलेन"; अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मत मांडलं. "सध्या देशात या सगळ्या साधनांचा जो गैरवापर होत आहे, तो देशासमोरील मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी राजकीय हेतुने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर ५ ते १० वर्षांपूर्वी ईडी ही संस्था नक्की काय आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नव्हतं. पण आता मात्र ईडी संस्था गावागावात फिरत आहे", असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. "ईडीच्या कारवाईची संसदेत माहिती समोर आली. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नाही तिथंच ईडीच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे", असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSharad Pawarशरद पवार