शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणांच्या धमकीनंतर बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन; सगळ्यांच्या अंगात ताकद, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 09:52 IST

रवी राणासोबतच्या विषयाला आणखी वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माझ्या मतदारसंघात जो निधी दिला त्यासाठी आभार मानण्यासाठी जाणार आहोत असं कडू यांनी सांगितले.

मुंबई - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. मला दम देत असाल तर घरात घुसून मारण्याची धमकी रवी राणांनी दिली. त्यानंतर कडू यांनी ५ तारखेला मी घरात आहे. ज्याला घरी यायचं आहे त्यांनी यावं, आम्ही तयार आहोत अशा शब्दात रवी राणांवर पलटवार केला आहे. त्यामुळे राणा-कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाला असून याबाबत आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

बच्चू कडू म्हणाले की, रवी राणासोबतच्या विषयाला आणखी वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माझ्या मतदारसंघात जो निधी दिला त्यासाठी आभार मानण्यासाठी जाणार आहोत. राणा विषयाकडे दुर्लक्ष करा असं अनेकांनी फोन करून सांगितले. व्यक्तिगत वादासाठी मी कधीही समोर आलो नव्हतो. विकासाचा दृष्टीकोन घेऊन आम्ही पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, रवी राणा वादावर ऊर्जा खर्ची करू नका. प्रसंगी ४ पाऊलं मागे घेऊ. चांगल्या कामासाठी मला ऊर्जा कामाला लावायची आहे. सगळ्यांच्या अंगात ताकद असते. मजबूत असतो. रवी राणासोबतच्या या विषयाला इथेच थांबवायचं आहे. त्यांच्या मागे कोण यावर मी बोलण्यास अर्थ नाही. या विषयावर मी बोलणार नाही असं सांगत बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले होते रवी राणा?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.  

त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेसुद्धा अखडून राहायचे. परंतु त्यांना मातीत धूळ खावी लागली. त्यामुळे जे असे अखडतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करत नाही. एखादा आमदार मनमोकळे करून पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करतोय. त्याच्यावर दमदाटीची भाषा वापरली जात असेल तर बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी खूप छोटा आहे. त्याला कसं उत्तर द्यायचं मला माहिती आहे. यापुढे तो ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा रवी राणांनी दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणा