शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

सेबीच्या नोटिशीनंतर सहकारमंत्री नरमले

By admin | Updated: August 17, 2016 18:40 IST

लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 17 - लोकमंगल अ‍ॅग्रो साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह परत करण्याची आपली तयारी आहे. मात्र यात कोणताही गैरव्यवहार नाही. कदाचित अनियमितता किंवा तांत्रिक चूक असू शकेल, असा खुलासा राज्याचे सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना केला. लोकमंगल अ‍ॅग्रो कंपनीने साखर उद्योग उभारणीसाठी ४ हजार ७५१ शेतकरी गुंतवणूकदारांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपयांचे शेअर्स (भाग भांडवल) जमा केल्याप्रकरणी सेबीने मंत्री सुभाष देशमुखांसह कंपनीच्या १२ संचालकांना नोटिसा बजावल्या होत्या. ही रक्कम शेतकऱ्यांना सव्याज परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्याच बरोबर कंपनीच्या संचालकांना रोखे बाजारात व्यवहार बंदी करण्याचे आदेश सेबीकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमंगलचे सर्वेसर्वा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वरील खुलासा केला.

ते म्हणाले, लोकमंगलने कारखान्यासाठी गावोगाव फिरुन शेअर्स गोळा केले आहेत. एका दिवशी ३९ पेक्षा अधिक सभासदांना शेअर्स विक्री करता येत नाही. ही तांत्रिक अडचण होती. त्यामुळे शेअर्स विक्रीत कदाचित अनियमितता आली असेल. पण यात कसलीही फसवणूक केली नाही. कायद्याचे अज्ञान असल्यामुळे काही चुका झाल्याची कबुली देशमुख यांनी दिली. सेबीने शेतकऱ्यांना शेअर्सच्या रकमा व्याजसह परत करण्याचे आदेश दिले असतील. तर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरणही देशमुख यांनी दिले. या प्रकरणात गैरव्यवहार झाला नाही, कोणत्याही बँकेने तशी तक्रार केली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून राजीखुशीने शेअर्स जमा केले आहेत. त्याचा हिशोब ठेवण्यात काहीसी गडबड असू शकेल. पण कोणाचीही फसवणूक केली, असे म्हणता येणार नाही. सेबीच्या नोटिसीला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सुब्रतो रॉयशी तुलना चुकीची !लोकमंगल अ‍ॅग्रो शेअर्स संकलन आणि सहारा समुहाचे सुब्रतो रॉय यांच्या व्यवहाराशी तुलना केली जात आहे. याबद्दल खंत व्यक्त करीत देशमुख म्हणाले, ही तुलना चुकीची आहे. सहारा समुहाने गुंतवणूकदारांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. त्यात गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकमंगलने शेतकऱ्यांकडून ठेवी नव्हे तर शेअर्सची रक्कम स्वीकारली आहे. शेअर्सधारक त्या कंपनीचे मालक असतात. ठेवीदारांबाबत तसे म्हणता येत नाही. सेबीच्या नोटिशीवर कायदेशीर उत्तर देणार आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देणार नाही. यासंदर्भात माझे कामच बोलेल. यापूर्वी लोकमंगल बँकेवरही असेच गंभीर आरोप झाले होते. मला आरोप नवीन नाहीत. -सुभाष देशमुखसहकार, पणनमंत्री