मुख्य सूत्रधार नऊ महिन्यांनंतर गजाआड

By Admin | Updated: May 28, 2014 01:19 IST2014-05-28T01:19:47+5:302014-05-28T01:19:47+5:30

भंगार वस्तू गोळा करणार्‍या चाळीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आरोपींमधील मुख्य सूत्रधार विशाल सूत (२८) याला अखेर तब्बल नऊ महिन्यांनी अटक करण्यात मुलुंड पोलिसांना यश आले

After nine months, | मुख्य सूत्रधार नऊ महिन्यांनंतर गजाआड

मुख्य सूत्रधार नऊ महिन्यांनंतर गजाआड

मुंबई : भंगार वस्तू गोळा करणार्‍या चाळीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आरोपींमधील मुख्य सूत्रधार विशाल सूत (२८) याला अखेर तब्बल नऊ महिन्यांनी अटक करण्यात मुलुंड पोलिसांना यश आले. या प्रकरणातील अन्य आठ आरोपींना मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर दोन आरोपी फरार होते. २१ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुलुंड कॉलनी अमरनगर परिसरात भंगार गोळा करणार्‍या महिलेला त्याच परिसरातील १० तरुणांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. अजय गेचंद, महेश मरागजे, वाहिद कय्युम खान ऊर्फ कल्लू, दस्तगीर अब्दुल खान, वसीम समद खान, मनजित सिंग गिल आणि भुवन हमाल, धीरज पांंचाळ या आठ आरोपींना मुलुंड पोलिसांनी घटनेनंतर अटक केली होती. तेव्हापासून मुख्य सूत्रधार विशाल सुत आणि दहावा आरोपी गुरुमुख हे पसार झाले होते. बलात्काराच्या या घटनेत पुढाकार विशालनेच घेतला होता. अखेर सोमवारी विशाल मुलुंडमध्ये येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश मनसुख आणि गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सापळा रचून विशालला अटक केली. फरारी विशाल पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरिद्वार आदी भागांमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा हरिद्वार येथे अपघात झाला होता. त्यामुळे तो मुंबईत परतला. न्यायालयाने त्याला १० दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: After nine months,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.