कानामागून आली अन् तिखट झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:10 IST2018-03-29T03:10:29+5:302018-03-29T03:10:29+5:30
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांची सुरुवात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे.

कानामागून आली अन् तिखट झाली
विजय मांडे
कर्जत : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांची सुरुवात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे. सध्या मिरचीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे. यंदा मिरचीच्या भावात २० ते २५ टक्के भाववाढ झाली आहे.
कर्जत बाजारपेठेत लोणावळा, बदलापूर, कल्यÞाण, पनवेल आदी भागातील महिला मिरचीची खरेदी करतात. जेवढ्या प्रमाणात मिरची आणि हळदीला मागणी आहे तेवढीच मागणी गरम मसाल्याला आहे. पूर्वी कर्जत बाजारपेठेत मिरची विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. त्या मानाने मिरचीची विक्र ी करणारी दुकाने कमी झाली आहेत. मात्र, जी दुकाने आहेत तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
यंदा मिरची गेल्या वर्षीपेक्षा महाग झाली आहे हे खरे असले तरी तीन वर्षांपूर्वी असलेल्या दरापेक्षा यंदा दर थोडे कमी आहेत.
- पंकज परमार, मिरचीविक्रेते, कर्जत
कर्नाटक, आंध्र, सोलापूर येथून मिरची विक्रीसाठी येत असते, कर्जत बाजारपेठेत काश्मिरी २०० - २४० रुपये किलो, बेडगी १८० - २०० रुपये किलो, शंकेश्वरी १४० - १५० रु पये किलो, लवंगी १२० - १३० रुपये किलो, गंटूर १२० - १३० रुपये किलो, पट्टी १२० - १४० रुपये किलो, हळद १०० - १५० रुपये, तर धणे १०० - १२० रु पये किलो असा दर आहे.