पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही तोतया आयपीएस अधिकारी ताब्यात

By Admin | Updated: March 9, 2017 23:52 IST2017-03-09T23:28:02+5:302017-03-09T23:52:36+5:30

पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही एका तोतया आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला नाशिकरोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

After IPS officer, the IPS officer was arrested in Nashik | पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही तोतया आयपीएस अधिकारी ताब्यात

पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही तोतया आयपीएस अधिकारी ताब्यात



नाशिक : पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही एका तोतया आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला नाशिकरोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे भासवून स्वत: आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या अभिजीत विजय पानसरे यास नाशिकरोड पोलिसांनी चौकशीसाठी रात्री साडेदहा वाजता ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस उपआयुक्त श्रीकांत धीवरे, सहायक पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांच्याकडून तोतया पोलीस अधिकारी पानसरेची कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, हा पानसरे तोतया पोलीस अधिकारी असल्याची माहिती धीवरे यांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकरोड पोलिसांनी सापळा लावून संशयित तोतया पोलीस अधिकारी पानसरे यास अटक केली आहे. त्याच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: After IPS officer, the IPS officer was arrested in Nashik