अखेर चार तासानंतर मोनोरेल सुरु
By Admin | Updated: August 1, 2016 11:28 IST2016-08-01T08:24:29+5:302016-08-01T11:28:33+5:30
वारंवार होणा-या बिघाडामुळे मुंबईची लोकलसेवा सातत्याने कोलमडत असताना आता मोनोरेलचाही त्याच मार्गाने प्रवास सुरु झाला आहे.

अखेर चार तासानंतर मोनोरेल सुरु
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - वारंवार होणा-या बिघाडामुळे मुंबईची लोकलसेवा सातत्याने कोलमडत असताना आता मोनोरेलचाही त्याच मार्गाने प्रवास सुरु झाला आहे. मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार तास वाहतूक ठप्प होती. चार तासांच्या प्रयत्नानंतर बिघाड दूर करण्यात मोनोच्या तंत्रज्ञानाना यश मिळाले.
वडाळा-चेंबूर दरम्यान सकाळी साडेसहा पासून मोनोरेलची वाहतूक बंद होती. वडाळयामध्ये भक्तीपार्कजवळ तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडली. सुदैवाने ड्रायव्हर वगळता एकही प्रवासी या गाडीमध्ये नव्हता. ड्रायव्हरला क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले.
दीड वर्षापूर्वीही मोनोरेल अशीच मध्येच अडकून पडली होती. त्यावेळी प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते.