पाच वर्षांनंतर महाविद्यालयांचे आता लेखापरीक्षण होणार
By Admin | Updated: July 15, 2014 03:21 IST2014-07-15T03:21:37+5:302014-07-15T03:21:37+5:30
उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियेच्या लेखापरीक्षणाची गरज असते. परंतु पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे लेखापरीक्षण रखडले होते

पाच वर्षांनंतर महाविद्यालयांचे आता लेखापरीक्षण होणार
मुंबई : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियेच्या लेखापरीक्षणाची गरज असते. परंतु पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे लेखापरीक्षण रखडले होते. लेखापरीक्षण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने भारतातील आणि जगभरातील विद्यापीठांमध्ये होणाऱ्या लेखापरीक्षणाचा अभ्यास करून लेखापरीक्षणाची नवीन पद्धत विकसित केली आहे.
पहिल्या टप्प्यात ५0 महाविद्यालयांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या २७ शैक्षणिक तज्ज्ञांची बैठक मंगळवारी कलिना विद्यानगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शैक्षणिक प्रक्रियेच्या लेखाजोखा परीक्षणाच्या प्रारूपाविषयी चर्चा होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यानंतर तीन तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. अशा नऊ समित्यांचे गठन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)