शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"देशात २०१४ पासून हिंदू ओळखले जायला लागले का?"; अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:25 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला देेवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गटाने पलटवार केला आहे.

Ambadas Danve on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन विधानसभेला त्या चुका टाळण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह  विधानसभा निवडणुकीसाठी  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधत ते महाराष्ट्राला संपवण्यासाठी येत असल्याचे म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी आरशात चेहरा पाहून घ्यावा असं प्रत्युत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आता ठाकरे गटाने पलटवार केला आहे.

नागपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजपाकडूनही उद्धव ठाकरे यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं गेलं. हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती, ती पुसण्याचा प्रयत्न झाला होता. ५०० वर्षांनंतर तो प्रयत्न मोडून टाकणारे अमित शाह हे आमचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकदा आपला चेहरा आकशात पाहून घ्यावा, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.

आता फडणवीसांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. "हो का देवेंद्र फडणवीसजी? म्हणजे या देशातील हिंदू हे हिंदू म्हणून २०१४ सालापासून ओळखले जायला लागले का? मग या ५०० वर्षांच्या कालखंडात हिंदूंची ओळख जपणारे आणि प्रसंगी बलिदान देणारे वीर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे झंझावाती नेते तुमच्या लेखी काल्पनिक पात्र आहेत म्हणजे!," असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल," असे उद्धव ठाकरे यांनी नागपुरातल्या सभेत म्हटलं होतं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहAmbadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा