शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांबाबत मीरा बोरवणकर यांचं मोठं विधान, म्हणाल्या…

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 19:49 IST

Meera Borwankar: माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकामधील काही धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे राज्यातील वातावरण सध्या तापलेलं आहे.

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकामधील काही धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे राज्यातील वातावरण सध्या तापलेलं आहे.  मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेल्या दाव्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, या दाव्यांमुळे अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असतानाच आता मीरा बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे. 

आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना मीरा बोरवणकर म्हणाल्या की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. मात्र मला आघाडीधर्म पाळावा लागेल, असं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, असे मीरा बोरवणकर म्हणाल्या. दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जमिनीच्या व्यवहाराप्रकरणात माझा काही संबंध नाही. मी त्यानंतर मुख्यमंत्री बनलो होतो. त्याबरोबरच त्यांनी बदलीच्या संदर्भात माझं नाव घेतलं आहे. मात्र प्रशासकीय कामानिमित्त त्यांनी मला बदलीची विनंती केली होती. मात्र मला आता याबाबत फार काही आठवत नाही. काय लिहिलंय ते पाहण्यासाठी मला ते पुस्तक वाचावं लागेल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, मीरा बोरवणकर यांनी द मिनिस्टर या प्रकरणामध्ये म्हटले आहे की, पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंबंधित विषय असल्याचे त्यांनी मला सांगितलं. त्यानुसार विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितले की, या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल, त्याच्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. पुढे या पुस्तकात, मी (मीरा बोरवणकर) पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या जमिनींचा लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडिरेकनरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस