शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

30 वर्षानंतर आयएनएस विराट सेवेतून निवृत्त

By admin | Updated: March 6, 2017 14:59 IST

तब्बल ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आज सेवेतून निवृत्त होत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि तब्बल ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आज सेवेतून निवृत्त होत आहे. भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतीक बनलेली आयएनएस विराट १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी २७ वर्षे ती ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. अशा प्रकारे ५७ वर्षांची सलग नौदल सेवा अन्य कोणत्याच युद्धनौकेने बजावलेली नाही.
 
नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितलं की, 'पुढील चार महिन्यात विराटला खरेदीदार न मिळाल्यास त्याचं भंगारात रुपांतर करण्यात येईल. विराट सेवेतून निवृत्त झाल्यानंतर तिला तोडून भंगारात बदलण्यात येईल'. याआधीची विमानवाहू नौका विक्रांतची रवानगी अखेरीस भंगारातच करण्यात आली होती. मात्र, आयएनएस विराटचे रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन असून अंतिम निर्णय तेथेच घेतला जाणार आहे.
 
‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ ज्याच्या हाती सागर, त्याचीच सत्ता, असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या विराटवर एकेकाळी १८ सी हॅरिअर विमाने व काही चेतक हेलिकॉप्टर्स होती. गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या समारंभात गोवा येथे या नौकेवरील विमाने व हेलिकॉप्टर काढून घेण्यात आली आणि त्यानंतर या नौकेला निवृत्त करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. शिवाय, या युद्धनौकेवर एकाच वेळी ११०० नौसैनिक असत. युद्धकालीन आणि शांतताकालीन मोहिमांमध्ये विराटने अतुलनीय कामगिरी बजावली. १९८९ साली श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेनेच्या ऑपरेशन ज्युपीटरमध्ये विराट सहभागी होती. शेकडो हेलिकॉप्टर फेऱ्या करून अनेकांना वाचवण्यात विराटने यश मिळवले. संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर २०११ मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून भारतीय संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून आपली भूमिका चोख बजावली होती. 
 
नवीन विमानवाहू नौका विक्रमादित्य आता पूर्ण क्षमतेने नोदलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर विराट निवृत्त होत आहे. एकाच वेळी तीन विमानवाहू युद्धनौका असाव्यात असे नौदलाचे धोरण आहे. दुसऱ्या विमानवाहू नौकेचे बांधकाम कोचीनमध्ये सुरू असून त्या नौकेचे नाव विक्रांत ठेवण्यात येणार आहे. नौदलासाठी आधुनिक बहुद्देशीय हेलिकॉप्टर मिळवण्याचा कार्यक्रमही लवकरच पूर्णत्वास जायला हवा, अशी अपेक्षा रिअर अडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केली.