शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 06:38 IST

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे

मुंबई - काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगड ही सत्ता असलेली राज्ये गमावली, तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला करिष्मा करता आला नाही. हिंदी पट्ट्यातील या तीनही राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र, पराभवाने मविआच्या राज्यातील जागावाटपात काँग्रेसला बॅकफूटवर यावे लागणार आहे. 

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे. असे असले तरी या निवडणुकीतील पराभवामुळे जागावाटपात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी समसमान जागा वाटपावर आग्रही राहण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी १५ जागांवर ठामराष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभेचे चारपैकी तीन खासदार शरद पवारांबरोबर आहेत. मात्र राष्ट्रवादीला (शरद पवार गट) राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १५ जागा हव्या आहेत. या १५ जागांवर निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

जनतेची पंतप्रधान मोदींना साथचार राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीजण मोदींचा करिश्मा ओसरला असे म्हणत होते. त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करत होते. मात्र जनतेने मोदींना साथ दिली हेच आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. घर घर मोदी, मन मन मोदी हेच या निकालामुळे सिद्ध झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा मोदीच निवडून येतील आणि इंडिया आघाडीचे पानिपत झालेले दिसेल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

मोदींशिवाय पर्याय नाहीचार राज्यांतील निवडणुकांच्या निकालातून देशाला मोदींचे नेतृत्वच मान्य असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून आता मोदींशिवाय पर्याय नाही. - अजित पवार, उपमुख्यमंत्री 

महाराष्ट्रात परिणाम होणार नाही तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात भाजपचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आजचे चित्र दिसणार नाही. त्यात बदल होईल आणि काँग्रेस पक्ष विजयी होऊन केंद्रात सत्तेत येईल.  - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी