शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

By गणेश वासनिक | Updated: April 1, 2024 22:54 IST

महायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारात होतेयं वापर

अमरावती : राज्यात १९९५ मध्ये युती उद्‌यास आली तेव्हापासून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप असो वा शिवसेना या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या पोस्टर, फ्लेक्स, बॅनर, पॉम्प्लेट आदींवर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असायचे. मात्र, यंदा पहिल्यांदाच तब्बल २५ वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवारांच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले जात आहे.

१९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकारदेखील स्थापन झाले होते. युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्री म्हणून गाेपीनाथ मुंडे यांची नोंद राज्याच्या राजकारणात झाली आहे. मात्र बदलते राजकीय समिकरण, वर्चस्ववाद, मतभेद आणि मनभेदामुळे २०१९ मध्ये भाजप-सेना युती दुभंगली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन तीन पक्षाच्या सरकारचा गाडा हाकला. परंतु, कोराेना ओसरताच शिवसेनेतील आमदारांनी निधी मिळत नाही. राष्ट्रवादीचे नेते अपमानास्पद वागणूक देतात. काँग्रेस, राष्ट्रवादीतून बाहेर पडा, असा सूर आवळला. नेमकी हिच खदखद भाजपने ‘कॅश’ केली.

एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे ४४ आमदार आणि १३ खासदारांनी उद्वव ठाकरे यांना ‘रामराम’ करीत वेगळी चुल मांडली. भाजपच्या आगळ्यावेगळ्या खेळीने सेना-भाजप युतीचे पुन्हा २०२२ मध्ये  सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार चालविण्यास प्रारंभ केला. यात भरीसभर अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली. तब्बल ४३ आमदार, सहा खासदार सोबत घेत अजित पवारांनी भाजप-सेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कारभार हाकत आहेत. भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षाचे सरकार हल्ली राज्यात अस्तित्वात आहे.शिंदेकडे शिवसेना तर अजित पवारांकडे राष्ट्रवादीची धुराराज्यात नाट्यमयरित्या झालेल्या घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष, चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा असल्याचा निर्वाळा दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्वव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय भविष्याची परीक्षा घेणारा ठरला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्वव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाले आहे.

उमेदवार कोणीही पण बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र कायममहायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात फ्लेक्स, बॅनर, पॉम्प्लेट आदी प्रचार साहित्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आवर्जुन दिसणार आहे. शिवसेना उद्वव ठाकरे गट अथवा शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांसह चांद्यापासून तर बांध्यापर्यंत महायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असणार आहे. एकंदरीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचारात २५ वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रांचा वापर करणार आहे, हे विशेष.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी