शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

22 वर्षांनंतर 596 अर्धवेळ ग्रंथपाल कायम, डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:17 IST

राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये 22 वर्षांपासून अर्धवेळ काम करणाऱ्या 596 ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

ठळक मुद्दे22 वर्षांनंतर 596 अर्धवेळ ग्रंथपाल कायमआमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये 22 वर्षांपासून अर्धवेळ काम करणाऱ्या 596 ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.राज्यात दोन हजार 409 पूर्णवेळ ग्रंथपाल व दोन हजार 322 अर्धवेळ ग्रंथपाल पदे आहेत. मात्र, सध्या राज्यात 596 पदे रिक्त होती. परंतु, राज्यात 988 ग्रंथपाल अर्धवेळ कार्यरत होते. गेल्या 22 वर्षांपासून अर्धवेळ ग्रंथपालांचा कायमस्वरुपी व पूर्णवेळ नियुक्तीसाठी लढा सुरु होता.

या संदर्भात भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.अखेर राज्यातील सेवाज्येष्ठतेनुसार 596 ग्रंथपालांचे रिक्त जागांवर समायोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच प्रत्येक शाळेत संचमान्यता झाल्यानंतर दीड महिन्यांत रिक्त ग्रंथपालपदांचा आढावा घेण्याचा निर्णय झाला.

उर्वरित जागांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे समायोजन केले जाणार आहे. या निर्णयामुळे 596 ग्रंथपालांना दिलासा मिळाला आहे. या समायोजनासाठी ग्रंथालय संघाचे शेखर कुलकर्णी, अनुजा गोखले, विभा भगरे, प्रवीण धुमाळ, मंगेश यशवंतराव यांनी प्रयत्न केले होते.

टॅग्स :literatureसाहित्यTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्रNiranjan Davkhareनिरंजन डावखरे