१० महिन्यानंतर लातूर शहराला नळाने पाणीपुरवठा....
By Admin | Updated: July 31, 2016 14:43 IST2016-07-31T14:43:28+5:302016-07-31T14:43:28+5:30
गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

१० महिन्यानंतर लातूर शहराला नळाने पाणीपुरवठा....
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ३१ : गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. परंतु मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्यात येत्या ४८ तासात नळाने पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय घेण्यात आला.
पाणीटंचाईने देशभरात गाजलेल्या लातूरकरांसाठी आनंदाची बातमी येत आहे. गेली सहा महीने लातूरच्या प्रत्येक घराला टँररने पाणी देण्यात येत होते. निन्म तेरणा प्रकल्पातून दररोज २५ लाख लिटर आणि मिरजेहून वारणेतील दररोज २५ लाख लिटर असे ५० लाख लिटर पाणी शहरासाठी यायचे. हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून प्रतिकुटुंब २०० लिटरप्रमाणे सुरूवातीली ७० आणि त्यांतर टँकपचा आकडा दुप्पट म्हणजे १४० टँकरने वाटप केले जायचे. पावसाळ्याचे दोन महिने चांगले गेले तरी धरणे आणि तलाव कोरडेच असल्याने लातूरकरांचे धाबे दणाणले होते. परंतु मागच्या दोन दिवसात पडलेल्या तुफान पावसामुळे तेरणा आणि मांजरा धरणीतील पाणीसाठा वाढला आहे.
त्यात निजामकालीन योजना असलेल्या मांजरा धरणातील नागझरी साई प्रकल्पात चांगले पाणी थांबले आहे. थोड्याशा प्रयत्नाने लातूरला पाणी येऊ शकते हे समजताच महापालिकेच्या स्थायी समितीची रविवारीही तातडीची बैठक झाली. पाणीपुरवठा कर्मचार्यांचा सल्ला घेऊन आता लातूरला प़़नळांने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्थायी समितीचे चेअरमन विक्रांत गोजमगुंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
रेल्वे सुरू ठेवणार की नाही हे गुलदस्त्यात
मांजरा नदीत पाणी साठले असले तरी मांजरा धरण मात्र अद्याप कोरडे आहे. २२९ एमएमक्युब क्षमतेच्या या धरणातून लातूरला नियमित पाणीपुरवठा केला जातो. त्यातला पाणीसाठा वाढायला तयार नाही. सध्या ३१ ऑगस्टपर्यंत मिरजेहून येणार्या जलपरीला मुदतवाढ मिळाली आहे. नळाने पाणीपुरवठा करताना सध्या या जलपरीसह निम्न तेरणातून येणारे २५ लाख लिटर गृहीत धरण्यात आले आहे.