परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच

By Admin | Updated: August 16, 2014 02:35 IST2014-08-16T02:35:16+5:302014-08-16T02:35:16+5:30

मुंबईसह राज्यातील मूोठ्या शहरांमध्ये प्रत्येकाला परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.

Affordable Homes Plan Soon | परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच

परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच

मुंबई : मुंबईसह राज्यातील मूोठ्या शहरांमध्ये प्रत्येकाला परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या मंत्रालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. घरांच्या किमती हा एक जटील विषय झाला असून त्यावर मात करणारी ही योजना असेल, असे ते म्हणाले. येत्या पाच वर्षात शासनाची प्रत्येक सुविधा आॅनलाईन करण्याचे ‘आॅनलाईन महाराष्ट्र’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेतले जाईल. त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे पूर्णपणे थांबतील. स्वच्छ, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाचे वचन सरकारने पूर्ण केले आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचे यापुढेही ध्येय असेल असे त्यांनी सांगितले. राज्याचा विकास करताना विकासाच्या या पंचसुत्रीत सुनियोजित नागरीकरण, उद्योगांचा समतोल विकास, शिक्षणाच्या दर्जात वाढ, कोरडवाहू शेती शाश्वत करणे आणि टंचाई कायमस्वरु पी दूर करणे या पाच महत्त्वाच्या बाबींवर भर दिल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रात राज्याने केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला. सरकारचे यश नेमके कशात आहे, याचा विचार केला तर सरकार आपले आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. त्यादृष्टीने ‘लोककल्याणकारी राज्या’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरलो आहोत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Affordable Homes Plan Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.