शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरु येथे हवाई दलाच्या ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाला गालबोट ,विमान अपघातात एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:36 IST

एहलंका विमानतळावर मंगळवारी प्रात्यक्षिके सुरू होती. 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्याने ती कोसळली.

ठळक मुद्देहवाई दलातर्फे दर दोन वर्षानंतर 'एअरो इंडिया' प्रदशनाचे आयोजन

निनाद देशमुख बंगळुरू- बंगळुरू येथे हवाई दलातर्फे आयोजित 'एअरो इंडिया'  प्रदर्शनाला गालबोट लागले. प्रकाशनात सूर्यकिरण एअरो ब्याटिक टीम हवाई कसरती सादर करणार होत्या. यासाठी एहलंका विमानतळावर मंगळवारी प्रात्यक्षिके सुरू होती. यावेळी 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्याने ती कोसळली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत प्याराशूट च्या साह्याने विमानातून बाहेर पडत ते जमिनीवर उतरले. मात्र एका वैमानिकाचा मृत्यू आणि दोन वैमानिक जखमी झाल्याचे डीजीपी फायर फोर्सेस एम. एन. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. हवाई दलातर्फे दर दोन वर्षानंतर 'एअरो इंडिया' प्रदशनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बंगळुरू येथील हवाई दलाच्या एलहंका विमानतळावर हे प्रदर्शन 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात देश विदेशातील अनेक देशांची विमाने तसेच हवाई दलाचे अधिकारी आणि अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एआरो ब्याटिक टीम ही हवाई कसरती सादर करणार होती. त्याची तयारी विमानतळावर सुरू होती. या दलाने हवेत उड्डाण घेतल्यावर कसरती करण्यास सुरवात केली. यावेळीमिड एआरो स्पिन मनुव्हर' कसरत करन्यासाठी दोन्ही विमाने जवळ आली यावेळी ती एकमेकांना धडकल्याने ती खाली कोसळू लागली. यावेळी प्रसंगावधान राखत वैमानिकाने प्याराशूट च्या साह्याने विमानाबाहेर उड्या मारल्या. यात एका वैमानिकाचा मृत्य झाला तर दोन वैमानिक जखमी झाले आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले असुन बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. जखमी वैमानिकाना उपचारासाठी हवाई दलाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती एम. एन. रेड्डी यांनी दिली आहे. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरairplaneविमानAccidentअपघातDeathमृत्यू