मुंबईत पावसाचे दमदार आगमन

By Admin | Updated: July 2, 2014 11:23 IST2014-07-02T11:23:09+5:302014-07-02T11:23:18+5:30

. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील लोणावळा, तळेगाव, महाबळेश्वर, कोयना या भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

The adventurous rainy season in Mumbai | मुंबईत पावसाचे दमदार आगमन

मुंबईत पावसाचे दमदार आगमन

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २- उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना बुधवारी पावसाने दिला आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील लोणावळा, तळेगाव, महाबळेश्वर, कोयना या भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. 
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणा-या मान्सूनने राज्याकडे पाठ फिरवली होती. जुलै उजाडला तरी पाऊस पडत नसल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली होती. मात्र बुधवारी पहाटेपासून मान्सूनने मुंबईसह अनेक भागांमध्ये दमदार एंट्री घेतली. मुंबईसह बोरिवली, अंधेरी, विक्रोळी, भांडूप या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. 

Web Title: The adventurous rainy season in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.