शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांसाठी ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी - राजकुमार बडोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 03:42 IST

सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी नवीन ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे, तसेच यासाठी २६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी नवीन ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे, तसेच यासाठी २६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.सह्याद्री अतिथीगृहात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आढावा बैठकीत बडोले बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिन दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बडोले म्हणाले की, राज्यात सध्या शंभर निवासी शाळांपैकी ८८ निवासी शाळा सुरू असून, त्यापैकी ३० मुलींच्या व ५८ मुलांच्या शाळा आहेत. या निवासी शाळांमध्ये १३ हजार ७९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नवीन निवासी शासकीय शाळा सुरू करताना अनुसूचित जातींची लोकसंख्या, सर्वसाधारण लोकसंख्येच्या साक्षरतेचे प्रमाण, लोकप्रतिनिधींची मागणी व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहाची उपलब्धता याबाबी विचारात घेऊन, ५० नवीन शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही आणखी काही निवासी शाळांना मंजुरी देण्यात येईल. यात प्रामुख्याने मुलींच्या शाळांना प्राधान्य देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या निवडक वस्तींचा विकास, नवीन मुलींचे वसतिगृह, ऐतिहासिक स्थळांचा विकास या कार्यक्रमांचा उर्वरित निधी तत्काळ खर्च करावा. विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळांच्या योजनांचा लाभ जास्तीतजास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, तसेच महामंडळाच्या पुढील नियोजनचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही बडोले यांनी दिले.

टॅग्स :Rajkumar Badolayराजकुमार बडोलेEducationशिक्षणSchoolशाळा