शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार: राज्य शासनाचे परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 17:14 IST

महाविद्यालयांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता

ठळक मुद्देमहाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया

पुणे : सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षणा संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवा,असे आदेश राज्य शासनाने उच्च शिक्षण विभाग व विद्यापीठांना दिले आहेत. विधी व न्याय विभागाच्या अभिप्राययानंतर हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ बंद झाला. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेही परिणाम झाला आहे.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी पप्रवेश प्रक्रियेची कार्यवाही थांबविली आहे. तसेच राज्य शासनाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन २०२० - २१ या शैक्षणिक वर्षाततील प्रवेश प्रक्रिया एसीईबीसी आरक्षण विरहित राबवावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देण्यात आला आहे.आता ही प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवावी लागल्यास महाविद्यालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.------------महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियाएसईबीसी आरक्षण विरहित २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया राबवा, असे राज्य शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र,यामुळे महाविद्यालयांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.- प्रा नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थी