शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे चालले बिहारला; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेणार भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:20 IST

राज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत.

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी २३ नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामागचं नियोजन सांगितलं नसलं तरी १ दिवसीय दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. 

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुकीची तयारीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे बुधवारी आदित्य ठाकरे एका दिवसासाठी बिहारला जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. बिहारच्या पटना येथे ते उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांना भेटतील. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व शिवसेना उपनेते खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे संघटनेत सक्रीयराज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत. बंडखोर शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी दौरे करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अभ्यासू शैलीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे राज्याबाहेर दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमताअलीकडेच भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यानंतर काही अंतर आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत सोबत केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय? अशी विचारणा करत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेTejashwi Yadavतेजस्वी यादवShiv Senaशिवसेना