उमेदवारीमुळे आदित्य ठाकरे वरळीतच अडकून ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 16:38 IST2019-10-07T16:37:58+5:302019-10-07T16:38:19+5:30
प्रचारासाठी आणखी अनेक दिवस शिल्लक आहेत. या दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार हे निश्चित आहेत. परंतु, आदित्य आपला मतदारसंघा सोडून राज्यातील शिवसेना उमेदवारांसाठी सभा घेणार का, याचा अद्याप उलगडा झाला नाही.

उमेदवारीमुळे आदित्य ठाकरे वरळीतच अडकून ?
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असून दिग्गज नेते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढविणारे आदित्य हे पहिले ठरले आहे. त्यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीमुळे ते वरळीतच अडकून पडल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळाला होता. याच यात्रेतून आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून निवडणूक जाहीर होताच, आदित्य यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार आदित्य यांच्यासाठी शिवसेनेकडून वरळीत मैदानही तयार करण्यात आले आहे.
आदित्य यांनी वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, राज्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ते अजुन तरी आपल्या मतदार संघातून बाहेर पडल्याचे दिसत नाहीत. ते सध्या वरळीत तळ ठोकून आहेत. पहिल्यांदा निवडणूक लढविणारे आदित्य इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदार संघातून बाहेर पडणार का, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
दरम्यान प्रचारासाठी आणखी अनेक दिवस शिल्लक आहेत. या दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार हे निश्चित आहेत. परंतु, आदित्य आपला मतदारसंघा सोडून राज्यातील शिवसेना उमेदवारांसाठी सभा घेणार का, याचा अद्याप उलगडा झाला नाही.