शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी जन्माला आले, म्हणून मंत्री झाले; बावनकुळे यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 23:54 IST

"एक चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे. मोदींच्या आठ वर्षांतच्या कार्यक्रमांना ब्रेक लावण्याचे काम मध्यंतरी अडीच वर्ष झाले."

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुण्या परिवारातून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या घरात जन्माला यावे लागते, तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, तेव्हा राहुल गांधी देशाचे नेते होतात. इंदिरा गांधीच्या घरातील असावे लागते तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होतात. पण भाजप एक असा पक्ष आहे, जेथे रस्त्यावर चहा विकणारा एक छोटा कार्यकर्ताही देशाचा पंतप्रधान होतो आणि देशाला जगात सर्वशक्तीशाली देश बनविण्याचे स्वप्न बघतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटले आहे. ते भिवंडीत येथे एका सभेत बोलत होते.

आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला आभिमान -बावनकुळे म्हणाले, जेव्हा आपण एक मत देतो तेव्हा सरकार बनते आणि जे सरकार बनते ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांच्या जीवनाचा निर्णय करते. ते सरकार बनविण्यासाठी जे मत असते, ते मत भाजपला मिळाले आहे. यामुळेच मोदीजी पंतप्रधान झाले आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला आभिमान आहे. 

भिवंडीत येणारी सर्व कामे उद्धव ठाकरे सरकारने रोखली - एक चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे. मोदींच्या आठ वर्षांतच्या कार्यक्रमांना ब्रेक लावण्याचे काम मध्यंतरी अडीच वर्ष झाले. जनकल्यानाची योजना अडीच वर्ष उद्धव ठाकरे सारकारने रोखली होते. भिवंडीत येणारी सर्व कामे उद्धव ठाकरे सरकारने रोखली होते. कारण राज्य सरकार जोवर हो म्हणत नाही. तोवर केंद्र सरकारकडून कितीही निधी आला तरी तो जनतेच्या कामी येत नाहीत, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी