शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचा पेच आदित्य यांच्या समावेशाने टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:45 PM2019-12-31T22:45:10+5:302019-12-31T22:45:43+5:30

नाराजीचा सूर; आता नगरविकास खात्यावरून रस्सीखेच

Aditya, the second highest commander in the Shiv Sena, was avoided | शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचा पेच आदित्य यांच्या समावेशाने टळला

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचा पेच आदित्य यांच्या समावेशाने टळला

googlenewsNext

ठाणे : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्याने राज्यातील सत्तेत पहिल्या क्रमांकाचा पेच मिटला होता. मात्र उद्धव यांच्यानंतर दुसºया क्रमांकावर कोण यावरुन शिवसेना नेते सुभाष देसाई व एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली रस्सीखेच आदित्य ठाकरे यांचा अगदी ऐनवेळी कॅबिनेटमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेऊन सोडवण्यात आला. आता सेनेकडे असलेले सर्वात महत्त्वाचे नगरविकास खाते कुणाकडे राहणार, यावरुन स्पर्धा लागली आहे. त्यामुळे हे खाते ठाकरे पिता-पुत्र स्वत:कडे ठेवणार का, अशी चर्चा सुरु आहे.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला तेव्हा या सरकारचे नेतृत्व कोण करणार, या विषयाभोवती चर्चा फिरत होती. ज्येष्ठतेच्या निकषानुसार सुभाष देसाई यांचे नाव घेतले जात होते तर संघटनात्मकदृष्ट्या सक्षम व पक्षाला रसद पुरवणारा नेता या निकषावर एकनाथ शिंदे हेच दावेदार होते. उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह मित्रपक्षाच्या काही नेत्यांनी धरल्याने पहिल्या क्रमांकाचा वाद संपुष्टात आला.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आता मुख्यमंत्र्यांनंतर कोण? या वादाने डोके वर काढले होते. दुसºया क्रमांकावरील नेतृत्व करणारी व्यक्ती ही ‘शॅडो चीफ मिनिस्टर’ असेल, अशी दोन्ही दावेदारांची भावना होती. सेनेत दुसºया क्रमांकावरुन संघर्ष होईल, अशी चिन्हे दिसताच सेनेतील काही वरिष्ठ नेते व ठाकरे कुटुंबातील काही व्यक्तींनी अगदी ऐनवेळी आदित्य यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश करण्याचा आग्रह धरला व तोच हा वाद रोखण्याचा मार्ग असल्याने स्वीकारला गेला.

साहजिकच दुसºया क्रमांकाचे दावेदार असलेले नेते हिरमुसले आहेत. आता नगरविकास खात्यावरुन सेनेत चुरस निर्माण झाली आहे. देसाई यांनी नगरविकास खात्याकरिता आग्रह धरला असून शिंदे हेही याच खात्याची जबाबदारी मिळावी, असे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे आता नगरविकास खाते कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

नगरविकास मुख्यमंत्र्यांकडे?
खात्यावरुन होणारा वाद टाळायचा असल्यास नगरविकास उद्धव हे स्वत:कडे ठेवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले तर राज्यातील सरकारचे नेतृत्व करण्याची मनिषा बाळगणाºया सेनेतील नेत्यांवर किरकोळ खात्यांवर समाधान मानण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे.

Web Title: Aditya, the second highest commander in the Shiv Sena, was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.