शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

"आंदोलन करणारे बदलापूरचे रहिवासी"; मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांनी समोर आणला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:07 IST

बदलापूरच्या ज्या आंदोलकांना अटक केली त्यांचे पत्ते बदलापूर येथील असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Badlapur School Crime : बदलापूरात १३ ऑगस्ट रोजी एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. आठवड्याभरानंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केलं. काही आंदोलकांनी ज्या शाळेत ही घटना घडली तिची तोडफोड केली. तर दुसरीकडे आंदोलकांच्या एका गटाने बदलापूर स्थानकात १० तास रेल्वेमार्ग रोखून धरला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पळवून लावलं. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप केला होता. मुख्यमंत्र्‍यांच्या दाव्यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक तब्बल १० तास रोखून धरली होती. यावेळी नागरिकांकडून लाडकी बहीण योजनेचाही निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आंदोलकांमध्ये बदलापूर लोक नव्हते तर बाहेरुन गाड्या भरुन लोकांना तिथे आणले गेले असा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला होता. त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत आंदोलनात अटक करण्यात आलेल्यांच्या नावाची यादी पोस्ट केली आहे.

"शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह. बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्या प्रेरित होतं. ८-९ तास आंदोलन सुरू होतं त्याला राजकीय पाठबळ होतं. स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरून लोकं आंदोलनासाठी आणण्यात आले होते. सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव होता. तर आंदोलन ठिकाणी लाडकी बहीण कार्यक्रमाचे पोस्टर घेऊन आले होते. दोलनात लाडकी बहीण योजना नको, बहीण सुरक्षित पाहिजे, असं फलक लगेचच कसे आलेत? लाडकी बहीण योजना हे विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, त्यांचा पोटात दुखलंय हे बदलापूरच्या आंदोलनातून दिसून आलं," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रक्षाबंधनामुळे मंगळावारी झाले आंदोलन

दरम्यान, अत्याचाराच्या घटनेविरोधातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :badlapurबदलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारCrime Newsगुन्हेगारी