शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अभिभाषण सभापटलावर मांडलेच नाही

By admin | Updated: March 10, 2015 04:03 IST

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाचा अधिकृत लेखी तर्जुमा सभापटलावर ठेवण्यात आला नाही.

मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाचा अधिकृत लेखी तर्जुमा सभापटलावर ठेवण्यात आला नाही. परिणामी अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शक ठरावही मांडला गेला नाही.एरवीच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण झाले की विधिमंडळ सचिवालयाकडून त्याच्या प्रती लगेच आमदार व पत्रकारांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु सोमवारच्या अभिभाषणाची प्रतच सभापटलावर न ठेवल्याने विधिमंडळ सचिवालय हे सविस्तर भाषण वितरित करू शकले नाही. नेहमीप्रमाणे छापील प्रत मिळेल या अपेक्षेने अभिभाषण सुरु असताना त्यातील मुद्द्यांची टिपणे न घेतलेल्या पत्रकारांची अडचण झाली. परंतु संध्याकाळी राजभवनावरून अभिभाषणाची प्रत प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्यात आली. राज्यपालांचे अभिभाषण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून थेट प्रक्षेपित केले गेले.विधानमंडळ सचिवालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी फक्त माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि इतर दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्याचाच विषय आणण्याचे ठरले होते. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणासंबंधी आभार प्रदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला नाही.सूत्रांनी हेही स्पष्ट केली असे पहिल्यांदाच घडलेली नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शोकप्रस्तावावेळीही असे घडले होते. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मांडण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)