रूळ ओलांडताना अभिनेते मुकेश रावल यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 04:18 IST2016-11-17T04:18:27+5:302016-11-17T04:18:27+5:30

दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’मध्ये बिभीषणाची भूमिका बजावणारे गुजराती अभिनेते मुकेश रावल (५५) यांचा रेल्वे रूळ

Actor Mukesh Rawal dies in crossing | रूळ ओलांडताना अभिनेते मुकेश रावल यांचा मृत्यू

रूळ ओलांडताना अभिनेते मुकेश रावल यांचा मृत्यू

मुंबई : दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’मध्ये बिभीषणाची भूमिका बजावणारे गुजराती अभिनेते मुकेश रावल (५५) यांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रावल हे कांदिवली पश्चिमेच्या लिंक रोडवरील केशर आशिष इमारतीत राहत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कांदिवलीत रेल्वे रूळ ओलांडत असताना त्यांना एका रेल्वेने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला. त्यांचे जावई जयेश बारभाया हे त्यांचा शोध घेत कांदिवली रेल्वे स्थानकावर आले तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्यांना रावल यांचा फोटो दाखवला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आणि सर्वांनाच धक्का बसला. (प्रतिनिधी)

Web Title: Actor Mukesh Rawal dies in crossing