शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: July 14, 2015 00:23 IST

मूळची कर्जतची असलेली आणि सध्या कामानिमित्त ठाणे येथे राहणारी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठार मारण्याची धमकी सहा दिवसांपूर्वी एका चिठ्ठीव्दारे देण्यात आली आहे.

कर्जत : मूळची कर्जतची असलेली आणि सध्या कामानिमित्त ठाणे येथे राहणारी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठार मारण्याची धमकी सहा दिवसांपूर्वी एका चिठ्ठीव्दारे देण्यात आली आहे. याबाबत जुईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने गडकरी कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे.कर्जत शहरातील विठ्ठलनगर परिसरात यशोदत्त अपार्टमेंटमध्ये जुई राहते. विविध मालिकांत आणि जाहिरातींमध्ये ती काम करते. शूटिंगसाठी मुंबईला जावे लागत असल्याने सध्या जुई ठाण्यात राहत आहे. ८ जुलैला जुईचा वाढदिवस होता. त्या दिवशी दुपारी एका बारा-तेरा वर्षांच्या मुलाने तिच्या काकांकडे एक चिठ्ठी दिली, ज्यात तिला २० तारखेला मारणार असल्याची धमकी देण्यात आली होती. ज्या मुलाने ही चिठ्ठी दिली, त्याला जबरदस्तीने पाठविण्यात आल्याचे त्याने सांगितले. जुईच्या काकांनी मुलाचा फोटो काढून पोलिसांना दिला आहे. जुई सध्या ठाण्यात ज्या घरात राहते, ते देखील बंद आहे. याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. काळबांडे यांनी दिली.