शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:50 IST

एखाद्या सिनेमाचा प्रभाव तुमच्यावर पडलाय का या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायक सिनेमाचा उल्लेख केला.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने 'FICCI FRAMES 2025' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षय कुमारच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलखुलास उत्तर दिली. सिनेमांचा वैयक्तिक आयुष्यावर पडणारा प्रभाव, पॉलिटिक्समधील रिअल हिरो कोण यासारख्या अनेक प्रश्नांवर फडणवीसांनी भाष्य केले. 

या मुलाखतीत अक्षय कुमारने नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनले तसं तुम्ही एक दिवसासाठी फिल्म डायरेक्टर बनला आणि त्या सिनेमाचं नाव महाराष्ट्र ठेवले तर त्याचा पहिला सीन काय चित्रित कराल असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर महाराष्ट्रावर सिनेमा बनत असेल, तर पहिला सीन असा असेल, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षाच्या गुलामीनंतर स्वराज्याचं निर्माण हेच त्याचा पहिला सीन असेल असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या उत्तरावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. 

त्याशिवाय एखाद्या सिनेमाचा प्रभाव तुमच्यावर पडलाय का या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायक सिनेमाचा उल्लेख केला. आमच्या संवेदना, मानवी भावना असतात त्यावर सिनेमाचा प्रभाव पडतो. अनेक सिनेमांनी मला प्रभावित केले आहे. राजकारणाचं बोलायचं झालं तर एका सिनेमानं मला इतकं प्रभावित केले, त्याशिवाय या सिनेमानं माझ्या समस्या वाढवल्या, त्याचं नाव आहे नायक..त्या नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभर इतके काम करतात ते पाहून मला अनेक लोक म्हणतात, तुम्ही नायकसारखे काम करा. एका दिवसात कसं त्यांनी जीवन बदललं, एवढे काम केले असं लोक मला सांगतात. मला एकेदिवशी अनिल कपूर भेटले, मी त्यांना विचारले तुम्ही नायक का बनवला? तुम्ही नायक आणि आम्ही नालायक असं लोकांना वाटू लागले. एका दिवसात तुम्ही इतक्या गोष्टी कशा केल्या, या सिनेमानं एक बेंचमार्क निर्माण करण्याचं काम केले. सिनेमाने नेहमीच आपल्या मानवी भावना जिवंत ठेवण्याचं काम केले असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.

पॉलिटिक्समधील रिअल हिरो नरेंद्र मोदी

अभिनेता अक्षय कुमार याने पॉलिटिक्समधील रिअल हिरो कोण असं मुख्यमंत्र्‍यांना विचारले. तेव्हा आज भारताकडे पाहिले तर राजकीय इतिहासात आम्हाला रिअल हिरो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात. भारतात गरिबी हटाओ नारा नेहमी दिला जायचा परंतु गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम मोदींनी करून दाखवले. आज भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. तंत्रज्ञान असेल, संरक्षण क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रात आज भारत जगाशी स्पर्धा करत आहे. आपण किती महान आहोत याची कहाणी ऐकत आलो परंतु आपण महान कधी बनणार हे कुणी सांगत नव्हते. आता आपल्याला मार्ग कळला आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतोय. हे चित्र नरेंद्र मोदींनी आमच्या डोळ्यासमोर आणले असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो - अक्षय कुमार

देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, मी आयुष्यात दुसऱ्यांदा मुलाखत घेत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा मी त्यांना आंबा कसा खातात हा प्रश्न केला होता. बऱ्याच जणांनी माझी खिल्ली उडवली होती परंतु मी सुधारणार नाही. तुम्ही नागपूरातून येता, तिथे संत्री मिळतात. तुम्ही ती कशी खाता, साल काढून खाता की मिक्सरमध्ये टाकून ज्यूस पिता? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर संत्र्‍याला पिळून रस काढण्यापेक्षा तुम्ही त्याचे २ भाग करा, त्यावर थोडं मीठ टाका, त्यानंतर जसं आंबा खाता तसं खा..त्याची साल खाऊ नका. संत्री अशी खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. जे नागपूरचे आहेत त्यांना हे माहिती आहे असं उत्तर फडणवीसांनी दिले. तेव्हा संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो, मी नक्की ते ट्राय करेन असं अक्षय कुमारने मुख्यमंत्र्‍यांना म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar asks Fadnavis about directing, gets Shivaji Maharaj answer.

Web Summary : Akshay Kumar interviewed CM Fadnavis, asking about films and politics. Fadnavis praised Modi as a real hero, citing poverty reduction. He'd film Shivaji's coronation if directing a Maharashtra movie. He also joked about the movie 'Nayak' and its impact.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkshay Kumarअक्षय कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी