अभिनेता आमीर खान गुरुवारी वरुडात

By Admin | Updated: May 4, 2016 22:47 IST2016-05-04T22:47:54+5:302016-05-04T22:47:54+5:30

सिने अभिनेता आमिर खान गुरुवारी ५ मे रोजी वरुड येथे येत आहे. वरुड तालुक्यातील वाठोडा या गावी सकाळी ६.३० वाजता आमिर खान येत असल्याची माहिती आहे

Actor Aamir Khan on Thursday in Vadod | अभिनेता आमीर खान गुरुवारी वरुडात

अभिनेता आमीर खान गुरुवारी वरुडात

ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 4- सिने अभिनेता आमिर खान गुरुवारी ५ मे रोजी वरुड येथे येत आहे. वरुड तालुक्यातील वाठोडा या गावी सकाळी ६.३० वाजता आमिर खान येत असल्याची माहिती आहे.

राज्यात पाणी फाउंडेशन तर्फे वॉटर कप स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.या स्पर्धेत वरूड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ५ मे रोजी सिने अभिनेता आमिर खान, अनिल भटकळ आदी वाठोडा येथे येऊन कालांतराने नागपूर कडे रवाना होतील.

आमिर खान यांच्यासह अभिनेत्री सई ताम्हणकर, ज्येष्ठ कलाकार अनिल बर्वे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ.अनिल बोंडे आणि ग्रामस्थ हे श्रमदान मोहिमेत सहभागी होणार आहेत.

Web Title: Actor Aamir Khan on Thursday in Vadod